दि. २८ ऑक्टोबर

इंदापूर तालुक्यात निमसाखर गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी….. साखळी उपोषणास पंढरीनाथ धनवडे या दिव्यांग युवकाचा एकदिवसीय मौन धारण करून पाठिंबा
इंदापूर : मराठा आरक्षणाचे लोन संबंध महाराष्ट्रभर पेटलेले असताना चार हजाराच्या आसपास गावात सर्वपक्षीय राजकीय नेते व पदाधिकारी यांना प्रवेश बंदी केलेले असतानाच इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावात सकल मराठा बांधवांतर्फे सर्व राजकीय पक्ष व नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे निमसाखर गावात सकल मराठा बांधवांचे साखळी उपोषण चालू असून या साखळी उपोषणास पंढरीनाथ धनवडे या दिव्यांग युवकानी एकदिवसीय मौन धारण करून पाठिंबा दर्शवला.

निमसाखर गावातील व पंचक्रोशीतील सर्व जाती धर्मातील लोकांनी मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शवला असून साखळी उपोषणास प्रचंड प्रमाणात सर्वजण उपस्थितीत आहेत या गावात साखळी उपोषण २६/१०/२०२३ पासून सुरू आहे.
राज्यभरात सकल मराठा समाजातर्फे मनोज जरांगे पाटील यांचे चालू असलेले आमरण उपोषणास पाठिंबा म्हणून साखळी उपोषण चालू आहे.
