प्रकाश आरडे :  स्वराज्य न्यूज

पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावास्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलाचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्यप्रदेश व तेलंगण सीमा भागात सुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. मोठ मोठ्या शहरात खेड्यातून स्थायिक झालेले व कालांतराने नव्या पिढीने शेतीकडे दुर्लक्ष करून शेती करण्यासाठी उदास झाल्याने विकून भूमीहीन झालेल्यांना नक्कीच  बैलपोळा या सणाच्या दिवशी आपल्या घरापुढे किंवा शेजारी असणाऱ्या बैलजोडयांचा आजचा रुबाब डोळ्यासमोर नक्कीच येतो म्हणून आपला छंद किंवा आजच्या दिवसाचे सोपस्कार मातीचे बैलांची पूजा करून पूर्ण करतात.

आजच्या दिवशी शेतकरी आपल्या लाडक्या व प्रामाणिक बैलांना आंघोळ घालतात व सुंदर अशा दागिन्यांनी सजवतात मग त्यांची मनोभावे पूजा करतात व त्यांना पुरणपोळी, गोड अन्न खाऊ घालतात व या मुक्या इमानदार पाळीव प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *