माढा तालुका प्रतिनिधी

टेंभुर्णी येथील वैष्णवी संजय लोंढे हिने मल्लिकार्जुन प्रशाला सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पीड बॉल स्पर्धेत सिल्वर मेडल द्वितीय क्रमांकाने यश मिळवल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. ही स्पर्धा दोन ऑक्टोंबर रोजी सोलापूर येथे झाली होती. डिसेंबर मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिची निवड झाली आहे. ती बबनरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अकोले येथे इयत्ता दहावी मध्ये शिकत आहे. तिला क्रीडाशिक्षक विजयकुमार माने, ज्योतीराम श्रीराम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तिचे आई-वडील संजय लोंढे व स्वाती लोंढे यांची सतत धडपड होती की मुलींना काहीतरी करून दाखविले biपाहिजे. त्यामुळे मला घरातून तसा प्रतिसाद मिळत आहे, म्हणून तिने हे यश मिळवले आह असे वक्तव्य वैष्णवी हिने केले.
यावेळी तालुका पंचायत समिती सदस्य वैभव कुटे, शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णीचे संचालक विलास देशमुख, संदीप करगळ, संतोष सटाले, धनंजय भोसले, संजय लोंढे, योगेश लोंढे, गणेश लोंढे, अजित लोंढे, नागेश लोंढे, राजेंद्र लोंढे, महेश पाटील, दादा कुटे, पवन लोंढे, पारस लोंढे, गजानन लोंढे, कृष्णा लोंढे, माऊली लोंढे, अर्जुन लोंढे इत्यादी उपस्थित होते.
