प्रकाश आरडे : स्वराज्य न्यूज

आज अश्विन महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी घटस्थापना व नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे.संपूर्ण भारत देशामध्ये आजच घटस्थापना होत असते व नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. घटस्थापनेच्या दिवशी दुर्गा मातेचे आगमन होत असते. नवरात्र उत्सव हा नऊ दिवस चालणारा सण आहे. संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या आनंदानेहा सण साजरा केला जातो. प्रत्येक गावांमध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये त्याचप्रमाणे खेड्यामध्ये सार्वजनिक मंडळांमध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात येते. या नऊ दिवसांमध्ये अनेक प्रकारचे खेळ, देखावे, स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि आनंदाने घेऊन भाविक भक्त त्यामध्ये सहभागी होत असतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक भावीक भक्त उपवास धरतात. काही लोक चपला घालत नाहीत. त्याचप्रमाणे नवरात्र उत्सवात सगळ्यात जास्त खेळला जाणारा खेळ म्हणजे गरबा होय. खासकरून हा खेळ गुजरात आणि महाराष्ट्रात आणि इतर वेगवेगळ्या राज्यात सुद्धा खेळला जातो. नवरात्रीत नऊ दिवस वेगवेगळ्या नवरंगाच्या साड्या परिधान करण्यात येतात.
नवरात्र उत्सव आपल्याला अनेक नवीन गोष्टी आत्मसात करून देत असतो. दुर्गा मातेची भक्ती भावाने पूजा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. दुर्गामाता ही महिषासुरमर्दिनी आहे ,माता दुर्गा यांनी महिषासुर या राक्षसाचा वध केला होता .दुर्गामाता पृथ्वीवर नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवस राहत असते. त्यानंतर दहाव्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. अनेक हिंदू सणापैकी नवरात्र उत्सव या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे.
आज २६ सप्टेंबर सोमवार घटस्थापना आहे .या घटस्थापनेला आज ३ वाजुन २४ मिनिटांनी शुभ मुहूर्त आहे .आजच्या घटस्थापना पासूनच नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. या नवरात्रीचे नऊ दिवस खूप पवित्र मानले जातात. या नऊ दिवसांमध्ये मांसाहार करू नये, दारू पिऊ नये तसेच लसुन आणि कांदा यांचा वापर करू नये खासकरून नऊ दिवसांमध्ये उपास ठेवावा आणि तोही निष्ठेने ठेवला पाहिजे या सर्व बाबींचे पालन शक्यतो करावे.
सर्वांना !!घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!!
