संतोष वाघमारे  :  स्वराज्य न्यूज टेंभूर्णी प्रतिनिधी

टेंभूर्णी ता.माढा येथील स्वरांजली म्युझिकल सिंगिंग प्रोग्राम यांचे वतीने गणेशोत्सव काळात अमृता वागज यांनी सुमधुर आवाजात गायलेले गणपती बप्पा वरील “तुझं मागतो मी आता” हे भक्तीगीत प्रसिद्ध करण्यात आले होते. हे गीत रसिक प्रेक्षकांच्या चांगलेच पंसतीस उतरले असून आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून या भक्तीगीताची चर्चा टेंभूर्णी परिसरात होत आहे.

गौरी गणपती सणा निमित्त गायिका अमृता सुधीर वागज यांनी यूट्यूब चैनल वर गायलेल्या तुझं मागतो मी आता या भक्ती गीताला सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या गीताला यूट्यूब चैनल वर पंधरा दिवसात हजारो व्हीव्हर्स मिळालेले आहेत. त्या सध्या जनाई संगीत क्लासेस चे शिक्षक गुरुवर्य सोपान मोरे सर यांच्याकडे त्या पुढील शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहेत. यासाठी त्यांना सासुबाई सुनिता व सासरे लक्ष्मण वागज, आई सुरेखा व वडील अण्णासाहेब ताकभाते हे दोघे तसेच पती सुधीर वागज व जाऊ व दिर ऐश्र्वर्या व रोहित वागज हे प्रोत्साहन देत आहेत. हे सर्व प्रोत्साहन देत असल्यामुळे मला गायनाची संधी मिळाली असल्याचे नवोदित गायिका अमृता वागज यांनी सांगितले. तर यापुढे ही अनेक हिंदी- मराठी भक्तिगीते व चित्रपट गीते गाऊन प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा मानस व्यक्त केला आहे. तर स्वरांजली म्युझिकल सिंगिंग प्रोग्राम यांचे वतीने यु ट्युब चैनल वर व कार्यक्रमात सादरीकरण करणार असल्याचे पती सुधीर वागज यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *