इंदापूर : कालच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील विरुद्ध महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे या दोघांमध्ये प्रमुख लढत झाली या लढतीमध्ये दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी आपलाच उमेदवार विजयी होणार हे ठामपणे आत्मविश्वासाने सांगत आहेत.परंतु शहरातील मेन चौकात हर्षवर्धन पाटील यांच्या विजयाचे बॅनर लावून कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या हा बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
इंदापूर विधानसभेत कालच झालेल्या मतदान प्रक्रियेत अतिशय संघर्षमय लढतीत कोण मारणार बाजी याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच व संपूर्ण तालुक्यात कोण होणार आमदार याची चर्चा चालू असताना शहरातील हर्षवर्धन पाटील कट्टर समर्थक संतोष देवकर यांनी आपला नेता निवडून आल्यात जमा आहे हे आत्मविश्वासाने बॅनरबाजीद्वारे दाखवून दिले आहे. हर्षवर्धन पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
या बॅनर मुळे शहरात हर्षवर्धन पाटील यांच्या विजयाची खमंग चर्चा चालू आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीत इंदापूरचा कोण होणार आमदार हे कळेलच.
