दि. २६ ऑक्टोबर

सरडेवाडी (जाधव वस्ती) ता. इंदापूर येथे  दि. २५ ऑक्टोबर रोजी  आदल्या दिवशी झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर चार वर्षीय  बालकाच्या मृत्यूपर्यंत गेल्याने परिसरात व तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली.

सविस्तर माहिती अशी की आदल्या दिवशी (दि.२४ ऑक्टोबर)  मयत मुलाचे वडील  जब्बार गफूर शेख  राहणार सरडेवाडी,जाधव वस्ती  व जयप्रकाश नरहरी देवकाते रा. सरडेवाडी, सध्या रा. शिवाजी चौक, खडकपुरा, इंदापूर जि. पुणे यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला होता. त्यावेळी जयप्रकाश नरहरी देवकाते यांने तुला बघून घेतो अशी धमकी देऊन निघून गेला व दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता ट्रॅक्टर घेऊन आला व माझ्या मुलाच्या अंगावर घातल्याने मुलाच्या मृत्यूस तोच कारणीभूत आहे अशी फिर्याद जब्बार गफुर शेख  याने दिल्याने इंदापूर पोलिसांनी भा.द .वि ३०२ (खुन) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान घटना घडल्यानंतर फिर्यादी व फिर्यादीचे नातेवाईकां मध्ये प्रचंड संताप व्यक्त करून इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्याशिवाय हटणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतल्याने काहीसा गोंधळ  उडाल्याचे चित्र होते.  घटना समजताच फिर्यादीच्या नातेवाईकांनी वेगवेगळ्या भागातून इंदापूर पोलीस स्टेशन व उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे धाव घेतल्याने प्रचंड गर्दी झाली होती.जमाव प्रचंड आक्रमक होता. महिला वर्गात प्रचंड आक्रोश व हळहळ व्यक्त करण्यात येत होती. घटनेचे गांभीर्य ओळखून अखेर प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून व माहिती घेऊन व घटनास्थळी गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांनी भेट देऊन व फिर्यादी व नातेवाईक यांच्याकडून घटनेची माहिती घेऊन अखेर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.

दरम्यान गणेश इंगळे,  उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांनी जमावाला खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आल्याचे सांगून  लवकरच आरोपीस अटक करण्यात येईल असे आवाहन केल्याने जमाव काहीसा शांत झाल्याचे चित्र दिसले.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *