दि. २ नोव्हेंबर

जेऊर तालुका करमाळा येथील युवक नागेश क्षिरसागर यांचा पाणी बॉटल ट्रान्सपोर्ट करण्याचा व्यवसाय व त्या व्यवसायाच्या निमित्ताने इंदापुरात हॉटेल धारकाला पोहोच केलेल्या पाणी बॉटल चे बिल देण्यास विलंब लावल्याने सैराट फेम मंग्या उर्फ मंगेश उर्फ धनंजय ननवरे यांनी सिंहा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब पोळ यांना मालवाहतूकदार युवकाला मदत करणे कामी फोन केला अन ताबडतोब सिंहा फाउंडेशनच्या माध्यमातून त्या युवकाला त्याच्या कामाचे व कष्टाचे पैसे मिळवून दिल्याबद्दल सिंहा फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी ची चर्चा होत आहे.
सिंह फाउंडेशनच्या माध्यमातून दादासाहेब पोळ व अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते ,गोरगरीब कष्टकरी, व व्यावसायिक, शैक्षणिक क्षेत्रातील, लघु व्यवसायिक, या विविध घटकातील लोकांना फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करण्याचे काम राज्यभर करीत असून त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कामाची सर्वत्र चर्चा होत आहे.
परवाच इंदापूर येथील बायपास रोडवर झालेल्या स्विफ्ट कार चा अपघात झाल्याचे कळताच दादासाहेब पोळ व अनेक युवक कार्यकर्ते अपघात स्थळी जाऊन अपघाताची सविस्तर माहिती घेऊन समोरील हायवा टिपरची चूक झाल्याचे लक्षात आल्याने संबंधित टिपरमालक यांना जागच्या जागी स्विफ्ट कारचे झालेली नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल कारचालकांनी सिंहा फाउंडेशनचे दादासाहेब पोळ व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
सध्या नोकरीविना असलेले सुशिक्षित बेरोजगार व त्यांच्या मध्ये असलेली कार्य कुशलता पोटापाण्यासाठी जोपासत असताना व्यवसायात आलेला तोटा सहन करत असतानाच जाणून-बुजून कष्टाचे व घामाचे दाम मिळण्यास अडचणी आल्यास कायदेशीर बाबीतून जाताना त्यास विलंब लागून कधीकधी हक्काचे व कष्टाचे पैसे सोडून द्यावे वाटते. कारण कोणत्याही व्यवसायात कोर्टकचेऱ्यामुळे मानसिकता बिघडून व्यवसायावर त्याचा परिणाम होतो म्हणून गप्प बसण्याशिवाय पर्याय राहत नाही,अशा वेळेला सिंहा फाउंडेशन अशा लोकांच्या मदतीला धावून येत असल्याने व नेमकेपणाने सनदशीर मार्गाने तो व्यवहार जागच्या जागी मिटविल्याने अनेकांच्या तोंडी सिंहा फाउंडेशनचे दादासाहेब पोळ व अनेक पदाधिकारी यांचे नाव चर्चेत आहे.
दादासाहेब पोळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की सिंहा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही संस्था सर्व जाती-धर्माच्या शोषित वंचित पीडितांनवर अन्याय अत्याचार होईल तो युवक माझा व मी त्याचा आहे .आम्ही सिंहा फाउंडेशन चे कार्यकर्ते त्या गोष्टीला न्याय दिल्याशिवाय राहत नाहीत असे प्रतिपादन दादासाहेब पोळ अध्यक्ष सिंहा फाउंडेशन यांनी केले..
