दि. १२ डिसेंबर

 इंदापूर : पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांची बदली  सोमवार (दि १२) झाल्याचे रात्री आठ वाजता समजताच शहरवासीयांबरोबरच तालुक्यातील सुजाण नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. इतकी तडकाफडकी बदली का?
इंदापूरचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर हे इंदापूर पोलीस ठाण्यात निरीक्षक पदी रुजू झाल्यापासून सर्वसामान्य जनतेमध्ये पोलिसांविषयी आपुलकी निर्माण झाली होती . छोट्या मोठ्या कारणावरून सर्वसामान्यांना पोलीस स्टेशनला मारायला लागणाऱ्या चकरा, व त्यातून होणाऱी प्रपंचाची अधोगती हे चांगले लक्षण नाही. आपण माणूस म्हणून जन्माला आलोय तर इतर माणसाबरोबर आपला सलोखा कायम टिकला पाहिजे हे समजावून सांगितल्याने, पोलीस ठाण्यात आलेले अनेक प्रकरणे सामोपचाराने मिटवण्याचा हातखंडा मुजावर साहेब यांच्याकडे होता. अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलने,मोर्चे धरणे,उपोषणे नेहमीच करत असत. परंतु पोलीस निरीक्षक मुजावर साहेबांच्या काळात याला बऱ्यापैकी आळा बसला होता.
बारा महिन्यातील सण, उत्सव, जयंती सर्व समाजाने एकत्र येऊन करावे व या उत्सवांना गालबोट लागू नये याची खबरदारी म्हणून शहरात पोलीस संचालन राबविल्याने शहरातील व तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त व्हायचे.
अनेक अवैद्य व्यवसायकांचे कंबरडे मोडण्याचे काम मुजावर साहेब यांच्या काळात नेत्रदीपक झाले. अनेक मोठ्या कारवाया देखील झाल्या.
सामाजिक संघटनेचे पदाधिकारी,राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सर्वसामान्य जनता, पत्रकार यांच्य मनामध्ये मुजावर साहेब यांच्या विषयी नेहमीच आदराची भावना राहिली. मुजावर साहेब प्रत्येकाशी कायम सलोखा ठेवत  यामुळे प्रशासनावरील येणारा ताण कमी असायचा.
           आशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली होण्यामागचे कारण काय ? हा प्रश्न शहरवासीयांबरोबरच तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. अनेकांनी याविषयी आश्चर्य व्यक्त केले. असे कर्तव्यदक्ष अधिकारी पुन्हा इंदापूरला लाभणे कठीण आहे असे देखील अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुजावर साहेब यांच्या बदलीचे कारण पोलिसांमधील अंतर्गत वाद आहे  ? असे देखील दबक्या आवाजात म्हटले जात आहे.
ही बदली जरी प्रशासकीय बाब असली तरी अनेक सामाजिक संघटनेतील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, कर्तव्यदक्ष नागरिक यांच्यामध्ये बदली विरोधात तीव्र भावना आहेत. काही कर्तव्यदक्ष सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटनेतील पदाधिकारी आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे बोलले जात आहे.
काही असो पण पोलीस निरीक्षक मुजावर साहेब हे सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत बनले होते याचमुळे सर्वसामान्या मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *