दि. १६ डिसेंबर

इंदापूर : सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक २०२२ – २०२७ निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. तालुक्यात एकूण २६ ग्रामपंचायत च्या निवडणुका आहेत. हिंगणगाव ग्रामपंचायत ची निवडणूक अनेक कारणाने नेहमीच चर्चेत राहते. या गावचे निवडणूक म्हटले की तालुक्यात लक्षवेधी निवडणूक असल्याचे पूर्वीच्या अनुभवावरून लक्षात येते. हे गाव निवडणुकीच्या बाबतीत नेहमीच संवेदनशील राहिले आहे.
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी चालू असून ९ सदस्य संख्या असणारया या ग्रामपंचायत च्या निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनल व जय तुळजाभवानी ग्रामविकास पॅनल असे दोन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात असून भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे प्रमुख माजी सरपंच रमेश (दादा) देवकर व त्यांना खंबीरपणाने साथ देणारे बिबीशन देवकर सिद्धेश्वर खराडे परमेश्वर देवकर मोहन देवकर नितीन आरडे संतोष आरडे हे प्रचाराची धुरा सांभाळत असून, सरपंच पदाचे उमेदवार सौ.रसिका दिगंबर आरडे या आहेत त्यांचे चिन्ह कपबशी आहे. जय तुळजाभवानी ग्रामविकास पॅनल प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विजय (तात्या ) देवकर व प्रचाराची धुरा सांभाळणारे जिल्हा परिषद सदस्य अभिजीत (भैया) तांबिले,संजय (नाना) तांबिले, मारुती कोळेकर, बाळासाहेब पाटील, विशाल जगताप, राजेंद्र (आबा) देवकर आहेत. या पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार सौ लता विनोद जगताप या आहेत त्यांचे चिन्ह शिट्टी आहे.
चालू हिंगणगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही पॅनल मधून नवखे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भैरवनाथ ग्रामविकास पॅनल कडून अनुभवी उमेदवार म्हणून माजी सरपंच नागनाथ चोरमले व सौ.सुशीला बंडू आरडे हे पुन्हा नशीब आजमावित आहेत तर जय तुळजाभवानी ग्रामविकास पॅनल मधून सौ.साधना कैलास देवकर या पुन्हा नशीब आजमावित आहेत. बाकीचे सर्व उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवखे आहेत.
हिंगणगाव ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण मागासवर्गीय महिला आहे. दोन्ही पॅनल मधून सुशिक्षित महिला सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असल्याने गावच्या ग्रामपंचायत इतिहासात पहिल्यांदाच सुशिक्षित महिला सरपंच मिळणार असल्याने ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण आहे. भैरवनाथ ग्रामविकास पॅनल मधून सरपंच पदाचे उमेदवार सौ रसिका दिगंबर आरडे या उच्चशिक्षित म्हणजे ग्रॅज्युएट(B.A) आहेत. जय तुळजाभवानी ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार सौ लता विनोद जगताप या इयत्ता दहावी शिक्षण झालेल्या आहेत.
दोन्ही पॅनल प्रमुख यांनी प्राचार यंत्रणा अतिशय शांततेत व संयमी वातावरणात आतापर्यंत पार पाडल्याने असे चित्र निवडणुकीपर्यंत राहिल्यास या गावाच्य आतापर्यंतची निवडणुकीमध्ये लक्षात राहण्याजोगी पंचवार्षिक निवडणूक म्हणून गणली जाईल हे निश्चित.
एक मात्र निश्चित लोकशाहीला अभिप्रेत असणारी प्रचार यंत्रणा दोन्ही पॅनल प्रमुखांनी अवलंबल्यामुळे मतदार राजा खुश असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मतदार राजा आपल्या मताचे दान कोणाच्या पारड्यात टाकतो व कोण निवडून येणार हे मात्र निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
