दि. २० फेब्रुवारी

इंदापूर (दि १९ ) : शहरात काल विविध राजकीय सामाजिक युवा पदाधिकाऱ्यांनी व शिवभक्तांनी शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांची प्रतिमेला अभिवादन करून शिवजयंती साजरी केली. अभिवादन करण्यासाठी सौ अनिताताई खरात यांनी बहुतांशी ठिकाणी गेल्या असता वरील उद्गार काढले निरोगी व दीर्घायुष्यासाठी तमाम शिवभक्तांना आगळया वेगळ्य शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी बोलताना त्या म्हणाले की शिवाजी महाराजांचे आरमार सशक्त होते ज्यांच्याजवळ आरमार त्यांचा समुद्र आहे. त्यामुळेच अनेक लढाया महाराजांनी जिंकल्या. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या धोरणाबरोबरच रयतेची, प्रजेची आणि तेवढीच पर्यावरणाची काळजी घेतली होती.
आपली शरीर महत्त्वाचे आहे त्याकडे काळाच्या ओघात अनेक तरुण लक्ष देत नाहीत आपल्या शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे . अनेक तरुण बांधव व्यसनाच्या आहारी जातात माझी तमाम शिवभक्तांना विनंती आहे की व्यायाम करा, सकस आहार घ्या, निरोगी व दीर्घायुष्य आयुष्य जगा याच माझ्याकडून व तेजपृथ्वी ग्रुप कडून शुभेच्छा.
