
प्रकाश आरडे : स्वराज्य न्यूज इंदापूर
जानकाबाई सदाशिव ढावरे वय 90 वर्षे रा.सरडेवाडी यांचे शुक्रवार (दि.०९सप्टेंबर) रात्री ११.४५ मि. दुःखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ९० वर्ष होते. त्यांच्या पाश्चात विवाहित चार मुले, तीन मुली, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
स्वतः अशिक्षित असताना आपली मुले शिकली पाहिजेत या जिद्दीने या माऊलीने अतिशय हलाखीच्या परिस्थितीत मुलांना उत्तम संस्कार देऊन व उत्तम शिक्षण देऊन चारही मुले नोकरीला आहेत. सरडेवाडी व पंचक्रोशीत व संबंध तालुका भर ढावरे कुटुंबीय आजात शत्रू कुटुंब म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर आदर्श कुटुंब व्यवस्था कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे जानकाबाई सदाशिव ढावरे यांचे कुटुंब होय असे पंचक्रोशीत म्हटले जात होते. श्री नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये प्राध्यापक असणारे संतराम ढावरे यांच्या त्या मातोश्री आहेत. पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये इंदापूर येथे कार्यरत असणारे भारत ढावरे यांच्याही त्या मातोश्री आहेत, तसेच मोठा मुलगा एसटी महामंडळातून निवृत्त झालेले आहेत तसेच दुसरा मुलगा पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागांमध्ये कार्यरत आहेत. चारही मुले स्वतः अशिक्षित असताना नोकरीला लावणे हे दुर्मिळ उदाहरण आहे म्हणूनच जानकाबाई ढावरे यांचे निधन हे मनाला चटका लावणारे आहे.
!! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो! !
