
प्रकाश आरडे : स्वराज्य न्यूज इंदापूर
राज्यातील २५ लाख दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय मंजूर व्हावे या प्रमुख मागणीसाठी आज (दि १२ सप्टेंबर) सोमवार तहसील कार्यालयालयावर दिव्यांग बांधवांनी एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन केले. या आंदोलनाला इंदापूर तालुका व बारामती तसेच शेजारील तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री व आमदार बच्चुभाऊ कडू संस्थापक अध्यक्ष असलेल्या प्रहार आपंग क्रांती संस्थे च्या वतीने एक दिवसीय लक्षणीक आंदोलन इंदापूर तहसील कार्यालयावर छेडले.
राज्यामध्ये सध्या २५ लाख दिव्यांग बांधव आहेत या दिव्यांग बांधवांच्या मागण्यासाठी व त्यांची प्रशासकीय पातळीवरील कामे त्वरित होण्यासाठी दिव्यांग बांधवांना हक्काचे स्वतंत्र मंत्रालय असावे, ग्रामपंचायत स्तरापासून मंत्रालयापर्यंत हे दिव्यांग बंधू यांच्या मागण्याचा पाठपुरावा करीत असताना त्यांना हक्काचे स्वतंत्र मंत्रालय असावे जेणेकरून आपल्या मागण्या त्वरित मंजूर करून घेता येतील व दिव्यांग बांधवांना सन्मानाने जगता येईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून माजी मंत्री आमदार बच्चुभाऊ कडू प्रणित प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने इंदापूर तहसील कार्यालयावर हजारो दिव्यांग बांधवांनी एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन केले. आपल्या मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना सादर केले मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी स्वीकारले.आपल्या मागण्याची दखल घेऊन शासन दरबारी त्वरित कळविले जाईल असे सांगितले.
निवेदनावर बाळासाहेब पाडुळे (जिल्हाध्यक्ष),अनंतराव गायकवाड {तालुकाध्यक्ष),दिपाली वाघमोडे (महिला तालुकाध्यक्ष),रामदास चव्हाण (सचिव इंदापूर तालुका),सचिन सूर्यवंशी (शहराध्यक्ष इंदापूर) इत्यादींच्या सह्या आहेत.यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव , पुणे जिल्हा महिला अध्यक्ष अनिता कदम ,उपाध्यक्ष उज्वला गाडेकर,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब जगताप उपस्थित व हजारो दिव्यांग बांधव उपस्थित होते.
