दि. १६ ऑक्टोबर

इंदापूर : (दि १६) संपूर्ण पुणे जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान संबंधित लाभार्थ्याच्या खात्यावर गेले काही महिने जमा झालेले नाही हे थकीत अनुदान ताबडतोब लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात यावे या मागणीसाठी शरद पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सागर बाबा मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी तहसील कचेरी वर थाळीनाद आंदोलन करून मागणीचे निवेदन तहसीलदार यांना दिले.
सोमवार(दि.१६) रोजी सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यांसह व लाभार्थ्यांसह तहसील कचेरी येथे थाळींनाद आंदोलन करून तहसीलदार यांना उपस्थित लाभार्थ्यांनी थकित अनुदान बँक खात्यावर जमा करण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन सागर बाबा मिसाळ जिल्हाध्यक्ष
थाळींना आंदोलन करत तहसीलदार यांच्या दालनात गेल्यानंतर तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याबरोबर चर्चा करून ही अनुदान न मिळाले मुळे ज्येष्ठ व आपुन लाभार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे हे हाल थांबविण्यासाठी व आमच्या भावना शासन दरबारी व संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे कळवा कळवाव्यात अशी विनंती जिल्हाध्यक्ष सागर बाबा मिसाळ यांनी केली
तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी लाभार्थ्यांची चर्चा करताना सांगितले की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या अनुदान मिळणे बाबत यापूर्वीच मी तसा प्रस्ताव संबंधितांना दोन वेळा पाठवला आहे आणखीही आपल्या भावना लक्षात घेऊन प्रस्ताव पाठवतो असे दिल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले
चौकट : येत्या पंधरा दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावर संजय गांधी निराधार योजनेचे थकीत अनुदान जमा न झाल्यास वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल : हनुमंत कांबळे, जिल्हा सरचिटणीस वंचित बहुजन आघाडी
यावेळी जिल्हाध्यक्ष सागर बाबा मिसाळ यांच्यासह महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर, सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष विकास खिलारे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष अनिल ढावरे, संमद सय्यद ,शिवाजी मखरे श्रीकांत मखरे, अरबाज शेख, मालोजी शेंडगे, संजय दुपारगुडे, काशिनाथ गायकवाड, नागेश क्षत्रिय ,श्रीमती रत्नप्रभा प्रभाकर ढवळसकर, संतोष कुंभार, गोरख खंडागळे, सुरेखा लोहार ,सुशीला हनुमंत खाडे, सुनिता भोसले सरपंच व अनेक पदाधिकारी, लाभार्थी उपस्थित होते
