दि. १७ ऑक्टोबर

इंदापूर : नवरात्र उत्सव २०२३ च्या निमित्त व युवा नेते सागर दादा आरगडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दांडिया व डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक सागर दादा अरगडे यांनी दिली.
या भव्य डान्स व दांडिया स्पर्धेसाठी प्रमुख आकर्षण गोल्डन मॅन व तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री अक्षया देवधर उपस्थित राहणार आहेत. तरी शहरातील व पंचक्रोशीतील सर्व माता-भगिनींनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे अशी आवाहन आयोजका तर्फे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण सरस्वती नगर येथे गणपती मंदिरा शेजारी असून हा कार्यक्रम मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी डान्स स्पर्धा सायंकाळी ५ वाजता आहेत व १८ ऑक्टोबर रोजी दांडीया स्पर्धा होतील व आयोजक सागर दादा अरगडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा आपणा सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
संपूर्ण कार्यक्रमाचे सादरीकरण सेलिब्रिटी अँकर आर जे अक्षय हे करणार आहेत.
तरी पंचक्रोशीतील माता-भगिनी, सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक सागर दादा आरगडे यांनी केले आहे.
