दि. १८ ऑक्टोबर

 

इंदापूर : इंदापूर तालुक्यात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणारा तेजपृथ्वी ग्रुप च्या वतीने पंचायत समिती शंकरराव पाटील अल्पबचत सभागृहामध्ये नवदुर्गा चा सन्मान सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. 

    सामाजिक क्षेत्रात धडाडीने काम करत असलेला तेजपृथ्वी ग्रुप तालुक्यात सर्व क्षेत्रातील मंडळींना आपलासा वाटतो कारण, प्रसंग कोणताही असो तेज पृथ्वी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिताताई खरात व त्यांचे कार्यकर्ते ताबडतोब घटनास्थळी मदतीसाठी हजर असतात. विशेषता महिला, मुली, शालेय विद्यार्थिनी, शेतकरी ,युवक वर्गांसाठी तेजपृथ्वी ग्रुपचे काम उल्लेखनीय आहे. 

काल दिनांक १७ ऑक्टोबर रोजी शंकरराव पाटील अल्पबचत सभागृह पंचायत समिती इंदापूर येथे नवदुर्गाचा सन्मान सोहळा अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, सहकार आरोग्य , अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सन्मान तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे राजेंद्र केसकर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, पंचायत समितीचे माजी सभापती महिंद्र रेडके, तेज पृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष सौ अनिताताई खरात इंदापूर च्या माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, धरमचंद लोढा,फिल्म इंडस्ट्री मध्ये कार्यरत असलेल्या मिताली कोळी ,अपेक्षा पांचाळ, गौतमी पाटील अभिनेत्री असलेल्या घुंगरू चित्रपटाचे निर्माते बाबा गायकवाड व अनेक मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी प्रमुख पाहुणे राजेंद्र केसकर आपल्या मनोगत मध्ये म्हणाले की महिलांनी निर्भीडपणे सामाजिक क्षेत्रात काम करावे. महिला शक्ती खूप काही करू शकते. सर्वच क्षेत्रात महिला पुढे आहेत, तुम्ही महिला या समाजात सर्व जबाबदारी पार पाडत असताना तेज पृथ्वी ग्रुपच्या वतीने तुमचा सन्मान होणे ही खूप मोठी कामगिरी अनिताताई खरात व पदाधिकारी करीत आहेत त्यामुळे या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो असे म्हणाले. 

      यावेळी मनीषाताई मखरे, चित्रलेखा ढोले, अमृता भोईटे,इंदू घनवट ,अरुणाताई कवडे , मनिषा वचे, अंकिता शहा,खैरुणिसा शेख ,अनुष्काताई भरणे ,अश्विनीताई ठोंबरे,जयश्री गटकुळ, राजमाता ग्रुप इत्यादी नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. 

      सन्मानाला उत्तर देताना लाखेवाडी गावच्या सरपंच चित्रलेखा ढोले, मनीषाताई मखरे, इंदू घनवट प्राध्यापक व जिजाऊ ब्रिगेड च्या पुणे जिल्हाध्यक्ष जयश्री गटकुळ यांनी तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष अनिताताई खरात यांचे आभार मानले व म्हणाल्या की तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून नेहमीच केलेल्या कामाचा महिलांना, शालेय विद्यार्थी, युवक शेतकरी,यांना नक्कीच फायदा होतो असे सांगून अनिताताई खरात व पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार व्यक्त केले. 

यावेळी नितीन कदम, नाना नरुटे,वशिम शेख, सूरज धाईंजे, विकास शिंदे, लक्ष्मण वाघमोडे, शुभम पवार, प्रशांत उंबरे, दत्ता पांढरे,संकेत वाघमोडे, सोनु सय्यद, विशाल म्हेत्रे प्रदिप पाटील हे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश शिंगाडे ,सद्दाम बागवान ,संदीप रेडके,आर जी साबळे, विजय पवार अमानत बागवान, यांनी प्रयत्न केले. रेश्मा ताई रेडके यांनी आभार प्रदर्शन केले.

नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे प्रस्ताविक नानासाहेब खरात यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *