दि. १८ ऑक्टोबर

इंदापूर :- (दि.१७) मुली व महिलांची सुरक्षितता व छेडछाडीस प्रतिबंध करणे हे निर्भया पथकाचे मुख्य उद्दिष्ट असून ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही कार्यरत आहोत,असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या बारामती उपविभागाच्या निर्भया पथक प्रमुख हवालदार अमृता भोईटे यांनी केले.
त्या मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथ. माध्य. व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात आयोजित माता पालक मेळाव्यात बोलत होत्या.
निर्भया पथक म्हणजे काय? त्याचे कार्य, तक्रार कोठे व कशी द्यावी? निर्भया पेटी, निर्भया सखी, आदीबाबींसह मुलींची व महिलांची होणारी छेडछाड थांबविण्यासाठी कसे प्रयत्न करावेत. चांगला स्पर्श ,वाईट स्पर्श याविषयी माहिती विद्यार्थीनींसह महिलांसमोर आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून अमृता भोईटे यांनी मांडली.
यावेळी सावित्रीबाई फुले, जिजाऊ माँसाहेब, माता रमाई,अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन प्रमुख पाहुण्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रशालेच्या वतीने पोलीस हवालदार अमृता भोईटे,माधुरी लडकत व संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे,पालक प्रतिनिधी मोहिनी शिंदेंसह माता पालकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी माधुरी लडकत, मनिषा जगताप यांची भाषणे झाली.
यावेळी सर्व माता पालकांसाठी फराळ व चहापाण्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माता पालकांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.
स्पर्धांसाठी माता पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धांचा मनमुरादपणे आनंद लुटला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेचे अध्यक्षा शकुंतला मखरेंनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब सानप यांनी केले तर सूत्रसंचालन नीता भिंगारदिवे यांनी केले .
यावेळी कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक साहेबराव पवार,प्राचार्या अनिता साळवे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिरालाल चंदनशिवे, सविता गोफणे,रेश्मा झेंडे, लता सातपुते, अनिसा मुल्ला,मेघा यादव यांनी विशेष परिश्रम घेतले.
