आशा चांदणे : स्वराज्य न्युज करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील प्रकल्प विभागातील जेऊर बीट १ याना सन. २०१९/२० चे आदर्श पर्यवेक्षिका, सेविका मदतनिस पुरस्कार जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने दिंनाक २४/९/२०२२ रोजी जामगुंडी मंगल कार्यालय सोलापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री दिलीप स्वामी, डेप्युटी सि. ई. अो. जावेद शेख, अध्यक्ष. अनिरुद्ध कांबळे, सभापती श्रीम. स्वाती शटगार, करमाळा प्रकल्प विभाग प्रकल्प अधिकारी मा श्री मानें साहेब व अनेक मान्यवर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते यांच्या हस्ते श्रीमती. सत्वशिला माचेवाड, सौ. आशा चांदणे, सौ. सुनिता बोराडे, यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी उपस्थित जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका मदतनिस, व इतर मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,या मिळालेल्या पुरस्काराबद्दल प्रकल्प अधिकारी मा श्री माने साहेब, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या, तसेच कुंभेज गावच्या सरपंच सौ. सिंधुताई गायकवाड, ग्रामसेवक पाटील भाऊसाहेब, दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय कुंभेज चे मुख्याध्यापक श्री पाटील सर, तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका सौ. निमगिरे मॅडम, व सर्व स्नेह मैत्रिणींनाी अभिनंदनाचा वर्षाव केला. सौ. आशाताई चांदणे या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा आहेत, तसेच मातंग अस्मिता संघर्ष सेनेच्या सर्व पदाधिकारी बांधवांनी व कुंभेज च्या सर्व युवा बांधवांनी या मिळालेल्या पुरस्काराबद्दल विशेष अभिनंदन केले.
