दिनांक १ जून

बारामती : तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार यांना मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रणवीर मॅडम यांनी दि. ३०/०५/२०२४ रोजी तेरा महिन्याची साध्या करावासाची शिक्षा सुनावली.
यामध्ये आरोपी गोपीनाथ उर्फ सोनाजी नारायण अलगुडे आणि नितीन दत्तात्रय जाधव दोन्ही रा गेवराई. जि बीड, यांचे विरोधात एकूण ४ प्रकरणे मे न्यायालयमध्ये दाखल होती त्यातील गुरन ५९५/२०२३ व गुरन ५८९/२०२३ भादवी ३८०, ४५४, ३४ चा पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय लेंडवे यांनी डी बी पथकाचे पोलीस हवालदार राम कानगुडे, पोकॉ मखरे, पोकॉ मदने, पोकॉ, दराडे यांच्या मदतीने नमूद गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला होता व सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लेंडवे यांनी सदर आरोपी विरुद्ध मा. न्यायालयात दोषारोप पाठवण्यात आले होते.
सरकारी वकील श्रीमती ए एस चव्हाण यांनी नमूद गुन्ह्यातील साक्षीदार तपासून तसेच माननीय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे वेगवेगळे न्यायनिवाडे मे. कोर्टात सादर केले त्यांनी सादर केलेल्या सर्व पुराव्यावर व केलेल्या युक्तिवादाचे सर्व मुद्दे गृहीत धरून नमूद आरोपीतास १३ महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर गुन्ह्यांमध्ये कोर्ट पैरवी म्हणून पोपट कवितके यांनी मोलाची भूमिका बजावली सदर निकालामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल एक चांगला संदेश गेलेला आहे.
सरकारी वकील श्रीमती ए. एस. चव्हाण आणि तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लेंडवे यांचे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती सुदर्शन राठोड आणि पोलीस निरीक्षक विजयसिंह चौव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
