दिनांक ३ जून

 

इंदापूर (दि.३) : लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना इंदापूर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी नागरिकांना सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी याविषयी आवाहन करताना वादग्रस्त व भडकाऊ पोस्ट टाकणाऱ्यांना व ग्रुप ॲडमिन यांना देखील कायदेशीर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा खणखणीत इशारा पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. 

प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निकाल उद्या दिनांक ४जून रोजी जाहीर होणार असून त्या अनुषंगाने कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाच्या द्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व तत्सम आपलिकेशनच्या माध्यमातून कोणत्याही समाजाच्या जातीच्या, धर्माच्या धार्मिक भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कमेंट, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमांद्वारे करू नये. तसेच कोणाचे विरोधात घोषणाबाजी करू नये, डीजे साऊंड सिस्टिम वाजवू नयेत, फटाके फोडू नयेत, तसेच विनापरवाना विजय मिरवणूक काढू नये तसेच व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी आपल्या ग्रुपचे सदस्यांनी भडकाऊ व वादग्रस्त पोस्ट केल्यास ग्रुप ॲडमिन ला जबाबदार धरले जाईल. त्यामुळे आपल्या ग्रुपचे सेटिंग बदलून ओन्ली ग्रुप ॲडमिन असे करावे. जर एडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्यांनी वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन सूर्यकांत कोकणे पोलीस निरीक्षक इंदापूर पोलीस स्टेशन यांनी केले आहे.

         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *