आज (दि.१०ऑक्टोंबर 2024 ) रोजी कला ,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे मानसशास्त्र विभागात जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जीवन सरवदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एस एम शिंदे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, कला शाखा विभाग प्रमुख डॉ. भिमाजी भोर उपस्थित होते. सदर पोस्टर प्रदर्शनामध्ये ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या पोस्टर्स मध्ये विविध मानसिक आजारांची माहिती व त्यावर उपचार यावर आधारित पोस्टर प्रदर्शन करण्यात आले होते. या प्रदर्शनास कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी उपप्राचार्य दत्तात्रेय गोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मानसशास्त्राचे विषय शिक्षक रोहिदास भांगे सर, व कल्पना भोसले मॅडम यांच्या नियोजनामध्ये मानसशास्त्र विभागाला भेट देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी व इंदापूर संचारचे संपादक पत्रकार सागर शिंदे उपस्थित होते. यांनी विद्यार्थ्यांना आनंदी जीवन कसे जगायचे याविषयी मार्गदर्शन केले. व विभागास एक घड्याळ सप्रेम भेट देण्यात आले .कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मानसशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक एसएम शिंदे सर यांनी मानसिक आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. प्रा. रोहिदास भांगे व कनिष्ठ विभागातर्फे मानसशास्त्र विभागाला पुस्तक संच भेट देण्यात आला.
