इंदापूर : अंकिता पाटील ठाकरे यांच्या एका डरकाळी ने उभ्या महाराष्ट्रात इंदापूर विधानसभेत हाय होल्टेज विधानसभा निवडणुक होणार हे निश्चित झाले होते.ते वाक्य होते दुधसंघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत “काहिही झाले तरी बेहत्तर हर्षवर्धन पाटील येणारी विधानसभा निवडणुक लढविणारच ” हे खरे झाले निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि बापासाठी लेक मैदानात उतरलीय येत्या रविवार (दि.१३ ) पासुन अंकिता पाटील ठाकरे यांची जनसंवाद यात्रा हजारोंच्या उपस्थितीत व्याहळी येथून सुरु होतेय.

 

अंकिता पाटील ठाकरे व राजवर्धन पाटील यांच्या जिव्हारी २०१९ च्या पराभवाची सल होतीच. याचा वचपा काढण्यासाठी दोघा बहिण भावांनी कंबर कसली आणि संपुर्ण तालुक्यावर लक्ष केंद्रित करून पाच वर्षे पायात भिंगरी बांधुन प्रत्येक गावात वाड्या वस्ती वर जाऊन थेट जनतेचे प्रश्न समजून घेऊन प्रत्येकाच्या सुखदुःखाला हजर राहून दिलासा देण्याचे काम केले आणि याच कामामुळे जनमानसात हर्षवर्धन पाटलांची प्रतिमा अधिक घट्ट होत गेली. तरुण युवकांबरोबरच ज्येष्ठांचा देखील सन्मान राखत आपण त्यांच्या अडीअडचणीला कसे उपयोगी पडता येईल याची इत्यंभूत माहिती दोघांनीही घेऊन थेट संपर्क ठेवल्याने यथासांग मदत केल्याने युवकांमध्ये व ज्येष्ठांमध्ये देखील याच गोष्टीमुळे नवचैतन्य आले व मरगळ झटकून हर्षवर्धन पाटील यांना निवडून आणायचेच याचा चंग बांधला.

नुकताच हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला यावेळी शरद पवार यांनी जाहीर व्यासपीठावरून तालुकावासीयांना आवाहन केले तुम्ही हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत पाठवा राज्याचे नेतृत्व करण्यासाठी जबाबदारी देण्याचे काम मी करतो या आवाहनामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले. समोर उमेदवार कोण आहे व किती आहेत याचा विचार न करता कार्यकर्त्यांमध्ये ही निवडणूक कशी सोपी जाईल यासाठी आपणाला काय करता येईल याची चाचपणी करण्यासाठी अंकिता पाटील ठाकरे यांचा रविवारपासून संपूर्ण तालुक्यात जनसंवाद दौरा आखला आहे.

 

श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी .. 

          लढणा-या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी

 

नवरात्र उत्सवानिमित्त अंकिता पाटील ठाकरे यांना गावोगावी देवीची आरती करण्यासाठी आमंत्रण दिले जातेय तिथे गेल्यानंतर त्यांचे प्रचंड जंगी स्वागत करून युवक, महिला, ज्येष्ठांचा त्यांना गराडा पडतोय व त्यांना खात्री दिली जातेय आम्ही यंदा भाऊंनाच मतदान करणार.

राजवर्धन पाटील यांनी देखील तरुणांचे भले मोठे संघटन उभा करून त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आशावाद निर्माण केला आहे व येणाऱ्या विधानसभेत हेच तरुण परिवर्तन घडविण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांचा दांडगा संपर्क हेच यशाचे गमक ठरणार हेच त्रिवार सत्य आहे.

चौकट

काल (दि. ११ ) रोजी इंदापुरातील  राष्ट्रवादी शरदचद्र पवार पक्षातील सोनाई उद्योग समूहाचे दशरथ माने, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेचे  माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण भैय्या माने कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भरत शेठ शहा यांनी  समर्थकांचा मेळावा घेऊन इंदापूर विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणार असल्याचे जाहिर केल्याने येणाऱ्या काळात शरद पवार व सुप्रिया सुळे हे बंड शमविण्यात यशस्वी होतील ? का याकडेही लक्ष लागुन राहिले आहे.

उद्यापासून (दि १३ )  व्याहळी तालुका इंदापूर येथुन सुरू होणाऱ्या भव्य जनसंवाद यात्रेमध्ये युवकांबरोबरच पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन अंकिता पाटील ठाकरे यांनी केले आहे.

कालच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून विधानसभेसाठी बंडखोरी होणार यावर शिक्कामोर्तब झाले . या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांच्यावर झालेल्या टीकेचा समाचार जनसंवाद यात्रेमध्ये अंकिता पाटील ठाकरे कसा समाचार घेतात याकडे तमाम तालुकावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *