
माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी आयोजित केलेल्या साठे नगर येथील नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
शनिवार (दि.३ सप्टेंबर )संपादक:- प्रकाश आरडे
इंदापूर साठे नगर येथे माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरामध्ये 300 रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करून अल्प दरामध्ये चष्मे आणि मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत करण्यात येणार आहे अशी माहिती दादासाहेब सोनवणे यांनी दिली.
साठे नगर येथील कै. अरुण नाना ढावरे सभागृहात पार पडलेल्या या नेत्र तपासणी शिबिरात साठे नगर मधील स्त्री पुरुष, तरुण मुले यांच्या डोळ्याची तपासणी चा कॅम्प आयडीएफसी फर्स्ट भारत ने गरजू नेत्र रुग्णांसाठी आयोजित केला होता.या शिबिराचे उत्कृष्ट नियोजन माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी केले होते. दादासाहेब सोनवणे हे साठे नगर मधील सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतात, त्यांच्या या उपक्रमाचे चर्चा इंदापूर शहर व तालुक्यामध्ये नेहमीच होत असते. वयोवृद्ध व गरीब रुग्णांसाठी आपलाही मदतीचा हात असावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दादासाहेब सोनवणे हे नेहमीच सामाजिक कामांमध्ये अग्रेसर असतात. त्यांनी आज हा स्तुत्य उपक्रम राबवून साठे नगर व पंचक्रोशीतील गरीब रुग्णांना मदतीचा हात दिल्याचे समाधान नेत्र तपासणी झालेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर दिसून आले. तपासणी झालेल्या रुग्णांनी या शिबिराचे तोंड भरून कौतुक केले. या शिबिरासाठी (सी एस आर रिजनल मॅनेजर महाराष्ट्र आयडीएफसी फर्स्ट भारत) श्री शरद देविदास देडे, (शाखाधिकारी आयडीएफसी फर्स्ट भारत इंदापूर) श्री प्रदीप आवटे तसेच (उपशाखा अधिकारी आयडीएफसी फर्स्ट भारत इंदापूर) श्री अतुल साखरे , समाधान लोंढे, प्रतिभा ठावरे आणि त्यांचे सहकारी तसेच शाखेतील सर्व कर्मचारी या नेत्र तपासणी शिबिरासाठी उपस्थित होते. या नेत्र तपासणी शिबिरासाठी डॉक्टर विठ्ठल नारायणकर, डॉक्टर मंजिरी पाटील आणि त्यांचे सहाय्यक सोनाली गायकवाड यांनी या नेत्र तपासणी शिबिरामधील रुग्णांची नेत्र तपासणी पूर्ण केली. आयडीएफसी फर्स्ट भारत सामाजिक बांधिलकी जपून वेगवेगळ्या प्रकारचे आणि लोकांच्या हिताचे उपक्रम नेहमीच
राबवत असते. या शिबिरात इंदापूर मध्ये साठे नगर मधील लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी मा. नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे ,सामाजिक कार्यकर्ते मयुर ढावरे,सामाजिक कार्यकर्ते उमेश ढावरे, बाळासाहेब आडसुळ, राजु शिंदे, मुकिंद शिंदे, विलास सोनवणे, सोमा ढावरे,बंडू साठे.उपस्थित होते.

