प्रत्येक विद्यार्थ्याने जिंकण्याची जिद्द ठेवावी- साक्षी ननवरे*
संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू व हँडबॉल पंच साक्षी रवींद्र ननवरे यांनी “खेळातून नव संकल्प करण्याचा ध्यास हवा” या विषयावर मार्गदर्शन करतानाप्रत्येक विद्यार्थ्यांनी जिंकण्याची जिद्द ठेवावी असे आवाहन केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जीवन सरवदे होते.
भारताचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जयंती दिवस म्हणजे २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. या क्रीडा दिनाचे औचित्य साधत कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाद्वारे इंदापूरची भूमीकन्या आंतरराष्ट्रीय खेळाडू व हँडबॉल पंच साक्षी रवींद्र ननवरे यांचे व्याख्यान अमर शेख सभागृहात आयोजन करण्यात आले होते.
साक्षी ननवरे ही विद्यार्थिनी ईस्ट लंडन युनिव्हर्सिटी ऑफ लंडन या ठिकाणी स्पोर्ट्स थेरपी यामध्ये करिअर करत आहे. करिअरच्या शोधामध्ये या इंदापूर कन्येचा इंदापूर ते लंडन हा प्रवास अतिशय रोमांचकारी व थक्क करणारा आणि इंदापूरकरासाठी तो अभिमानास्पद सुद्धा आहे. व्याख्यानातून आपला हा प्रवास आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले त्यातून विद्यार्थ्यांना एक सकारात्मक ऊर्जा व प्रेरणा मिळाली.
महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ, कला शाखाप्रमुख डॉ. भिमाजी भोर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र साळुंखे, विद्यार्थी विकास कल्याण मंडळ अधिकारी डॉ. तानाजी कसबे, यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कनिष्ठ विभागाचे क्रीडा शिक्षक बापू घोगरे यांनी केले.
आभार परीक्षा विभाग प्रमुख डॉ. आत्माराम फलफले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *