दि. २३ ऑक्टोबर

इंदापूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा या योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून नागरिकांना अन्नधान्य किटचे वाटप सामाजिक कार्यकर्ते प्रा. अशोक मखरे यांच्या हस्ते शहरातील पांधारा नजीक असणाऱ्या जुना कचरे रोडवरील पिके जगताप यांच्या स्वस्त धान्य दुकानाच्या वतीने करण्यात आले
आनंदाचा शिधा किटमध्ये एक किलो प्रमाणे डाळ साखर रवा आणि एक लिटर तेल पिशवी यांचा समावेश आहे शासनाचा हा स्तुत्य उपक्रम असून किटचे वाटप झाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे असे प्रा. अशोक मखरे म्हणाले यावेळी माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, प्रा.बाळासाहेब मखरे, महेंद्र सोनवणे, दुकान चालक राजू जगताप, अहमदरजा सय्यद, अनिल कातरकी, बोधिसत्व मखरे, प्रकाश भंडलकर, इत्यादी उपस्थित होते.
