प्रकाश आरडे : स्वराज्य न्युज

दिव्यांगाना शासकीय दाखल्यासाठी हेलपाटे मारून त्रस्त होण्याऐवजी गाव स्तरावर जसे ग्रामसेवक,तलाठी ,आरोग्य सेविका व तत्सम यंत्रणेमार्फत शासकीय कामकाजासाठी लागणारे दाखले घरपोच देण्यात यावेत व त्यांची या दाखल्यासाठी होणारी ससेहोलपट थांबवावी, आशा आशयाचे निवेदन प्रेमकुमार जगताप पुणे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा यांनी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की दिव्यांगांना आर्थिक लाभ होण्यासाठी किंवा हयातीचा दाखला तसेच वयाचा दाखला मिळण्यासाठी तालुकास्तरावर हेलपाटे मारावे लागतात हे बांधवा अगोदरच दिव्यांग असतात त्यात हेलपाटे मारून त्रस्त होतात. संबंधित अधिकारी वेळेवर उपलब्ध नसतील तर दिव्यांग बांधवांची भयंकर ससेहोलपट होत असते,ती होऊच नये यासाठी ग्रामस्तरावर कार्यरत असणारे ग्रामसेवक,तलाठी आरोग्य कर्मचारी किंवा तत्सम यंत्रेमार्फत जागच्या जागी दाखले वितरित करण्याची सोय आपल्या स्तरावरून करण्यात यावी अशी विनंती निवेदनात केली आहे.निवेदनाच्या प्रती तहसीलदार व संबंधित यंत्रणेला देण्यात आलेल्या आहेत.
दिव्यांग बांधव तालुकास्तरावर येत असताना व्हीलचेअर, वॉकर किंवा इतर साधनांचा आधार घेऊन येत असतात. त्यावेळी त्यांना भयंकर मनस्तापाला सामोरे जावे लागते. या दिव्यांगाना दुसऱ्या व्यक्तीच्या आधाराशिवाय उभा ही राहता किंवा बसता देखील येत नाही,तसेच कृत्रिम अवयव असलेल्या दिव्यांग नागरिकांना विविध दाखले मिळविण्यासाठी स्वतः हजर राहणे गरजेचे असते तेव्हा फार कसरत करावी लागते,आपल्या मार्फत दिव्यांग बांधवांना लागणारे शासकीय दाखले संबंधित यंत्रणेमार्फत जागच्या जागी घरपोच वितरित करण्यात यावेत व त्यांना तसा अधिकार संबंधित कर्मचाऱ्यांना द्यावा असेही निवेदनात म्हटले आहे.
