सपकळवाडी गावात जागृत ग्राहकराजा ग्राहक संघटना इंदापुर तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र सपकळवाडी यांच्या संयुक्त विध्यमानाने जागतिक महिला दिना निमित्त महिलांसाठी रक्तदाब व हीमोग्लोबीन तपासणी शिबिर आयोजीत केले होते.

महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमा साठी महिलांना डॉ स्वाती लवंगारे यांनी सिजर ऑपरेशन टाळण्यासाठी लज्ज्या गौरी मोहीम व नैसर्गीक प्रस्तुती तज्ञ यावर मार्गदर्शन केले.

महिलांनी आपल आरोग्य जपत आपल्या घरात परसबाग शेती करून आपल व कुटुंबाच विषमुक्त शेती करून आरोग्य जपाव अस आव्हान केले   

 सिजर ऑपरेशन हे आता वाढत आहे ही एक चिंताजनक बाब आहे असे मत व्यक्त केले यामधून स्त्रीला होणारे आजार यावर डॉक्टर लवंगारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केलं.

  या वेळी ॲड पूजा घोलप, दुर्गाताई शुक्रे अध्यक्षा महानगरपालिका पुणे, दिलीप फडके सर संस्थापक अध्यक्ष, रोहिणी सोनवणे सरपंच, सुनिता सपकळ पोलीस पाटील, हरीष फरतडे उपअध्यक्ष पुणे महानगरपालिका, दिलीप निंबाळकर सदस्य ग्राहक संरक्षण परिषद पुणे, शिवाजी सोपान सपकळ मा सरपंच, शत्रुघ्न घाडगे अध्यक्ष इंदापुर तालुका, डॉ नामदेव कुगणे, डॉ उमेश गवळी संगीता कोकरे आरोग्यसेवीका, रेखा मोरे शितल सपकळ, दिलीप दुपागुडे, रविंद्र खरात, तानाजी खैरे, कुणाल दुपारगुडे व ग्रामस्थ व सणसर परिसरातील परिचारीका उपस्थीतीत होत्या.

शत्रुघन घाडगे गावांमध्ये व परिसरामध्ये विविध सामाजिक उपक्रम नेहमी राबवत असतात.

सुत्रसंचालन शत्रुघ्न घाडगे यांनी केले व आभार सुदर्शना भुजबळ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *