इंदापूर : तालुक्यातील हिंगणगाव येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यांच्या यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भैरवनाथ यात्रा उत्सव समिती, हिंगणगाव यांच्या वतीने हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

उत्सवाची सुरुवात गुरुवार दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जयंती सोहळ्याने होणार आहे. त्यानंतर शुक्रवार दिनांक ३ एप्रिल रोजी श्री भैरवनाथांची छबीना मिरवणूक काढण्यात येणार आहे. शनिवार दिनांक ४ एप्रिल रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ ते रात्री १ वाजेपर्यंत भव्य ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणांचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे.

या सर्व कार्यक्रमासाठी परिसरातील भाविकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन भैरवनाथ यात्रा उत्सव समिती, हिंगणगाव यांच्या वतीने करण्यात आले

आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *