
इंदापूर : पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जकीर काझी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रविवार दि. 5 फेब्रुवारी रोजी इंदापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटी तसेच चमनभाई बागवान मित्र परिवार यांच्या वतीने मोफत आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड काढणे शिबीर चे आयोजन करण्यात आले होते.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड धारकांकरिता एक हजार 209 प्रकारच्या विविध आजारांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येतात. पात्र लाभधारकांना पाच लाख रुपये प्रति वर्ष प्रति कुटुंब प्रमाणे लाभ मिळतो.

या वेळी इंदापूर तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सर्वश्री आबासाहेब निंबाळकर, उपाध्यक्ष निवास शेळके, जिल्हा सरचिटणीस जकीर काझी, शहर अध्यक्ष चमनभाई बागवान, जिल्हा सरचिटणीस बिभिषण लोखंडे, तालुका सचिव महादेव लोंढे, उपाध्यक्ष राहूल वीर, शिवाजी आहेर, हमीद आतार युवा उद्योजक सागर सूळ,राष्ट्र सेवा दलाचे रमेशआबा शिंदे एड.इनायतअली काझी तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष आमदार संजय जगताप यांनी दूरध्वनीवरून जकीर काझी यांना वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
*चौकट*
सदरहू कार्यक्रम सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू राहणार होता. परंतु सहकुटुंब मोठ्या संख्येने आलेले नागरिक ज्यात महिला व मुलांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे कार्यक्रमाची वेळ वाढविण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन चांगल्या प्रकारे करण्यात आले होते. त्यामुळे लाभार्थींनी समाधान व्यक्त
