दि. ११ फेब्रुवारी
इंदापूर : दिनांक ९ फेब्रुवारी रोजी इंदापूर पोलीस पथकाने सरडेवाडी टोलनाका येथे विशाखापट्टणम येथुन पुणे कडे जाणाऱ्या क्रेटा चार चाकी वाहनांमध्ये व्यवसायाकरिता वाहतूक करणाऱ्या गांजा सह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळविले असून सत्तर लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
सविस्तर माहिती अशी की इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये नुकतेच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त खाबऱ्यामार्फत माहिती मिळाली की सोलापूर कडुन पुणे हायवे वरून एक हुंदाई कंपनीची क्रेटा कार (MH -42 AR -5656) मध्ये काही लोक अमली पदार्थ(गांजा) घेऊन जाणार आहेत. माहिती मिळताच कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सरडेवाडी टोल नाका येथे सापळा लावला. सापळा लावलेल्या ठिकाणी ही संशयास्पद गाडी येताच थांबवण्याचा प्रयत्न केला असता, वाहन चालकाने गाडी न थांबवता टोलनाक्यावरील डिव्हायडर वर चढवल्याने गाडी जागीच थांबली. गाडी जवळ जाऊन पोलीस पथकाने त्या गाडीची पाहणी केले असता,गाडीच्या डिक्की मध्ये व मधल्या सिट खाली खाकी रंगाचे चिकटपट्टीच्या आवरण असलेले १२० पॅकेटस दिसून आले या पॅकेटची तपासणी केली असता २४० गांजा आढळून आला. गाडीतील दोन जणांना १) रुपेश दिलीप जाधव राहणार वृंदावन पार्क कसबा, तालुका बारामती जिल्हा पुणे २) सुनील तुळशीदास वेदपाठक राहणार वाघज रोड देवळे पार्क बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे यांना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्यावर गु. र. नं. २०२/२०२३ गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क), २०((ब), २९(२) (क), २९,भा.द.वि.क ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार हे करीत आहेत.
हि कार्यवाही अंकित गोयल,पोलीस अधीक्षक, आनंद भोईटे अप्पर पोलीस अधीक्षक, गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस नाईक सलमान खान ,पोलीस हवालदार बालगुडे ,पोलीस शिपाई लक्ष्मण सूर्यवंशी, दिनेश चोरमले, शिधाराम गुरव ,विनोद काळे, गजानन वानोळ, विकास राखुंडे विक्रम जमादार या पथकाने सदर कारवाई मध्ये भाग घेतला.
विशेष म्हणजे हजारो किलोमीटर वरून हा अवैद्य गांजा चार चाकी वाहनातून येत असताना या मार्गावर पोलीस नव्हते काय ? याला अभय कोणाचे ? मग इंदापूरतीलच पोलिसांना याची खबर कशी काय ? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत या प्रश्नाचे उत्तरे अटक केलेल्या आरोपीकडून मिळतीलच.
Post Views: 440
