दि. १५ मार्च

 

 

इंदापूर : काल (दि१४) शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. या प्रतिष्ठानचे यंदाचे तिसरे वर्ष आहे महिला दिन साजरा करण्याचे.मागिल दोन वर्षी होम मिनीस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.तसेच या वर्षी लाखो युवकांचे प्रेरणास्थान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते युवा कीर्तनकार व प्रखर विचारवंत सोपान दादा कनेरकर यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील महिला प्रचंड संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी नगराध्यक्ष अंकिता शहा यांनी विशेष सहकार्य केले..कार्यक्रम शिवशंभो प्रतिष्ठानचे मार्गदर्शक पोपट पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.तसेच या प्रसंगी अनुराधा गारटकर,अलका ताटे,उमाताई इंगोले,मायाताई विंचू,  नगरसेविका राजश्रीताई मखरे, अनिता खरात,स्मिता पवार,उज्वला राऊत,सायरा पठाण रेशमा शेख ( प्रदेश सचिव ,मानव विकास परिषद) व कलाा, क्रीडा, सामाजिक, राजकिय, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्राातील महिला प्रचंड संख्येने उपस्थित होत

 कार्यक्रमासाठी शिवशंभो प्रतिष्ठानचे सर्व सदस्यांनी कठिण परिश्रम घेतले. तसेच आभार शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि.शुभम पोपट पवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले व आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *