दि. १५ मार्च

 

 

 

इंदापुर तालुक्यातील बाभुळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच शैला जावळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव ८ विरूद्ध १ एवढ्या मतांनी संमत झाला.

जानेवारी २०२१ च्या सार्वत्रिक निवडणूकीत सरपंच शैला जावळे या निवडून आल्या होत्या. हनुमान ग्रामविकास पॅनल या भाजप्रणीत पॅनल कडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी अणिल दशरथ चव्हाण, छाया तानाजी यादव, शैला सोमनाथ जावळे, दिनेश लक्षण वायकर, नागनाथ भिवा गुरगुडे, संगिता राजाराम इंगळे, दादासाहेब साहेबराव भोसले, शितल मधुकर खिलारे, रेश्मा सुखदेव गुरगुडे हे नऊ सदस्य म्हणून बाभुळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यावेळी सरपंच पद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने शैला जावळे या सरपंच पदी विराजमान झाल्या होत्या. वर्षभरापूर्वी सरपंच शैला जावळे व सोमनाथ जावळे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सामील झाल्याने भाजप गटाच्या सदस्यांत नाराजीचा सूर उमटला होता.

संरपंच शैला जावळे यांच्या विरोधात ग्रामपंचाय सदस्यांना विस्वासात घेत नाहीत, गावच्या विकासाची कामे करत नाहीत ग्रामपंचायत ठरावाची अंमलबजावणी करणेस टाळाटाळ करीत करतात, आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत आहेत, सरपंच मनमानी कारभार करत आहेत, सहकारी सदस्यांना अपमानकारक वागणूक देतात, सरपंच यांचे पती सोमनाथ जावळे कामकाजामध्ये हस्तक्षेप करतात अशी कारणे देत अविश्वास प्रस्ताव मांडला होता. दि १४/०३/२०२३ सकाळी ११ वाजता तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ८-१ असा अविश्वास ठराव मंजूर झाला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनवे यांच्या नेतृत्वात तिन पोलिस अधिकारी आणि मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *