दि. २० मार्च

हिंगणगाव : (दि. २०) आरोग्यवर्धिनी उपकेंद्र हिंगणगाव येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. सर्व रोग निदान व उपचार, नेत्र तपासणी, उच्च रक्तदाब, मधुमेह या आजारावर तज्ञ् डॉ कडून तपासणी व उपचार,मोफत मोतीबिंदू शस्त्र क्रिया, मोफत रक्त तपासणी,आहार विहार व व्यायामचे महत्व मार्गदर्शन ,मासिक पाळी व सॅनिटरी पॅड विषयी जागरूकता मार्गदर्शन करण्यात आले…

     या धावपळीच्या युगात दिवसेंदिवस गाव खेडयातील व शहरातील तरूणां बरोबरच जेष्ठ देखील आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात परिणामी त्या रुग्ण किंवा कुटुंबाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते, यासाठीच शासनाच्या आरोग्य विभागाकडून महिला, तरुण व जेष्ठ यांच्यासाठी आज आरोग्यवर्धिनी उपकेंद्र हिंगणगाव येथे आरोग्य शिबीर संपन्न झाले या शिबिरात. … 

 

एकूण 403 रुग्णांनी लाभ घेतला …. 

या शिबीराचे वैशिष्ट्य म्हणजे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर राज्य कर्मचाऱ्यांचा संप असून देखील आजच्या शिबिरामध्ये आरोग्य खात्यातील डॉक्टर व आशा सेविका यांनी सकाळपासूनच हिर्हेरीने भाग घऊन आपल्या कर्तव्येशी आपण एकनिष्ठ आहोत हे दाखवून दिल्याने रुग्ण व नातेवाईक यांच्याकडून या आरोग्य खात्यातील देवदूतांचे मनापासून आभार मानले.

ग्रामस्थांनी या शिबिरात हिरीरीने भाग घेतला. यावेळी हिंगणगावचे सरपंच सौ रसिका दिगंबर आरडे उपसरपंच सौ प्रमिला सिद्धेश्वर खराडे, सदस्य सौ संध्याराणी राजेंद्र खराडे,प्रदीप मधुकर देवकर, डॉ. सुरेखा पोळ तालुका आरोग्य अधिकारी इंदापूर, डॉ राहुल तांबिले MD मेडिसिन, डॉ. प्रीती रेड्डी चामले,,वैद्यकीय अधिकारी पळसदैव, डॉ सुवर्णा शिंदे CHO हिंगणगाव, डॉ सुषमा जलमकर CHO लोणी देवकर, डॉ प्रियांका गजाकोष CHO गलांडवाडी नं. १,शरद शिर्के नेत्र चिकित्सक बारामती, महालॅब टीम बिजवाडी,तेजश्री सातव व टीम ,wellness coach पूणे योगिता सूर्यवंशी, ANM, सर्व आशासेविका…उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *