दि. ०६ एप्रिल

 

रस्त्याने प्रवास करीत असताना दोन चाकी व चार चाकी वाहन धारक रस्त्यात उभ्या असलेल्या प्रवासी यांना पुढच्या प्रवासाला घेऊन जाताना चे चित्र पहावयास मिळते. पण एखादा राज्याचे मंत्री पद भूषविणारा व विद्यमान आमदार असणारा रस्त्यात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहून आपल्या गाडीत बसवून त्या विद्यार्थ्यांना घरपोच सोडणारा असा एखादाच राजकारणी असतो. आज अशाच प्रसंगाने संबंध तालुका भर विद्यार्थी पालक यांच्यामध्ये खमंग चर्चा रंगली व भरणे मामाच्या साधेपणाने विद्यार्थीही सुखावले व त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. 

            सविस्तर माहिती अशी आज (दि.६) लासूर्णे येथील श्री. निलकंटेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना घरी सोडवण्यासाठी थेट तालुक्याचे आमदार दत्तात्रय मामा भरणे स्वतः गाडीत बसून आले. आमदार दत्तात्रय भरणे आज इंदापूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी भेटी देत होते. यावेळी लासूर्णे येथे काही विद्यार्थी थांबलेले दिसले. यावर त्वरित गाडी थांबवत आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. त्यांना कुठे जायचे आहे याची चौकशी केली व विद्यार्थ्यांना घेऊन गाडी थेट अंथुर्णे गावामध्ये पोहोचली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मन सुखावणारा असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यानी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *