दि. १७ एप्रिल

इंदापूर : पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बावडा दूरक्षेत्र हद्दीतील नरसिंहपुर व पिंपरी गावामध्ये अवैद्य देशी विदेशी दारू विक्रेत्यावर (दि.१६) कारवाई करून मोठ्या प्रमाणात दारू साठा जप्त केला
पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी या कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी यांचे एक पथक तयार करून नरसिंहपूर व पिंपरी गावामध्ये या अवैद्य दारू विक्रेत्यावर धडक कारवाई करीत हातभट्टीसह देशी विदेशी दारूसह महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
बावडा दूर शेत्र हद्दीमध्ये गेल्याच आठवड्यात काटी व लाखेवाडी गावामध्ये अवैद्य हातभट्टी व देशी विदेशी दारू विक्रेत्यवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या तीनही कारवाई मध्ये एकूण १४११००/ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती
आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, महिला पोलीस हवालदार माधुरी लडकत, पोलीस नाईक कदम, गायकवाड, सलमाान खान,पोलीस शिपाई सय्यद आरणे, मिरकले, राखुंडे यांनी मिळून केली.
