दि. ११ मे

 

इंदापूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या दहा मे रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी इंदापूर शहर यांनी भव्य असे रक्तदान शिबिर इंदापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, डॉ. आंबेडकर नगर इंदापूर येथे आयोजित केले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन मा. राज कुमार ( जिल्हाध्यक्ष पुणे पूर्व ), यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून मा. मनोज साबळे, (तालुकाध्यक्ष),.गोविंद कांबळे (सहसचिव), गौतम कांबळे (महासचिव), राहुल कांबळे (प्रसिद्धीप्रमुख) .राजेंद्र जगताप( ता. उपाध्यक्ष उपाध्यक्ष) , फिनेल चव्हाण (सह संघटक) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात इंदापूर शहर व तालुका यामधील विविध भागातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला. एकूण ८६ बॅग रक्त संकलित करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर शहर अध्यक्ष सुभाष खरे यांनी माहिती दिली व सर्व सहभाग नोंदवणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किर्तीकुमार वाघमारे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी इंदापूर शहर, अजय साळुंखे महासचिव वंचित बहुजन आघाडी इंदापूर शहर, राहुल गुंजवटे सहसचिव वंचित बहुजन आघाडी इंदापूर शहर,राहुल मखरे संपर्कप्रमुख वंचित बहुजन आघाडी इंदापूर शहर, राजेंद्र साबळे, राहुल मोरे, सिद्धांत खरे, आशुतोष मखरे, ज्ञानदेव ढगे, सोमनाथ खानेवाले, गणेश जाधव, विकास साबळे, शशिकांत कांबळे इ.प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *