दि. ११ मे

बुधवार (१०) रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते व वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने डॉ. नामदेव गार्डे, सतिश व्यवहारे सर यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय इंदापूर या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. 

         यावेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी पुणे जिल्हा सचिव हनुमंत तात्या कांबळे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. मनिषा ताई चंदनशिवे,सुनीता चंदनशिवे, प्रमोद भाऊ चव्हाण,पवन पवार,सिद्धार्थ साळवे,हमीद भाई अत्तार, गवळी रावसाहेब,बापू नाचन, सागर चंदनशिवे, डॉ. नवनाथ पोटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *