दि. १६ मे

इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्याला ताब्यात घेतले असून, संग्राम विलास मदने वय.२७ वर्षे ( रा.काटी, ता. इंदापूर जि. पुणे) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. बेकायदेशीर, विनापरवाना पिस्टल बाळल्यामुळे त्याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सविस्तर माहिती अशी की, दिनांक १५ मे रोजी दुपारी ०३.३० वाजताच्या सुमारास गुन्हे शोध पचकास मौजे. काटी, ता. इंदापूर, जि. पुणे येथील वेताळ बाबा मंदिरा जवळ इसम नामे संग्राम विलास मदने (वय २७, रा. काटी, ता. इंदापूर जि.पुणे) हा त्याच्या कंबरेला गावठी पिस्टल लावून थांबला असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथक तात्काळ सदर ठिकाणी रवाना झाले. संशयित इसम संग्राम मदने यास पोलीस आल्याचे चाहूल लागताच तो सदर ठिकाणाहून पळून जावू लागला असता त्याला पथकाने पाठलाग करून पकडून त्याची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरलेला एक गावठी पिस्टल व पॅन्टच्या उजव्या खिशामध्ये एक जिवंत काडतूस मिळून आले. त्यास ताब्यात घेवून त्याने बेकायदेशीर विना परवाना पिस्टल जवळ बाळल्यामुळे त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामिण अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पो.नि. दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, नागनाथ पाटील, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश माने, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कॉन्टेबल नंदू जाधव, विनोद लोखंडे, गजानन वानूळे, गणेश डेरे ,अकबर शेख, विकास राखुंडे, होमगार्ड संग्राम माने यांनी केलेली आहे.
