दि. ६ ऑगस्ट

 शाह यांचा सत्कार करून साखर उद्योगाने व्यक्त केली कृतज्ञता!

 

इंदापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून देशाचे पहिले सहकार मंत्री व गृहमंत्री अमितजी शाह यांनी देशातील साखर उद्योगासाठी अनेक प्रशंसनीय असे धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्याबद्दल देशातील व महाराष्ट्रातील साखर उद्योग अमितजी शाह यांचे बद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहे, असे गौरवोद्गार भाजप नेते व राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.6)अमित शाह यांचे सत्कार प्रसंगी काढले.

        पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे बहुउद्देशीय सभागृहात केंद्र सरकारच्या सहकार विभागाच्या बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या पोर्टलच्या अनावरण कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने देशातील साखर उद्योग बळकटीसाठी अनेक चांगले निर्णय घेतलेबद्दल अमितजी शाह यांचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी या सत्कारा संदर्भाचे प्रास्ताविक केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मा. बी एल वर्मा, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

      हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, देशामध्ये स्वतंत्रोत्तरकाळानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सहकार खाते निर्माण केले व या सहकार खात्याचे पहिले मंत्री अमित शाह झाले. त्यांनी खात्याचा कार्यभार हाती घेताच देशातील साखर उद्योगाचा रु. 10 हजार कोटी रुपयांचा प्राप्तिकर माफ केला. खरतर प्राप्तीकराची माफीची रक्कम ही व्याज व दंड मिळून ही रक्कम रु. 30 हजार कोटी पर्यंत जात आहे.

        तसेच त्यांनी नॅशनल को-ऑपरेटिव्ह शुगर डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एन.सी.डी.सी.) च्या माध्यमातून साखर कारखान्यांना इथेनॉल, डिस्टलरी व सहवीज निर्मिती प्रकल्प विस्तारीकरण, मार्जिन मनी व कॅपिटल मनी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष बाब म्हणून रु.10 हजार कोटी रुपयांच्या कर्ज पॅकेजला मंजुरी दिली. तसेच इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी रु.2 लाख कोटी रक्कमेची इथेनॉल सबवेन्शन स्कीम जाहीर केली, त्यामुळे देशातील इथेनॉल उद्योगाला चालना मिळाली आहे, असे प्रशंसनीय उदगार भाषणात हर्षवर्धन यांनी काढले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांचेसह राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष डॉ.जयप्रकाश दांडेगावकर व मान्यवरांनी अमित शाह यांचा पुणेरी पगडी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देऊन कृतज्ञता पत्र देऊन सन्मान केला. वेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी वातावरण प्रफुल्लित बनले होते.

 

चौकट :- भाषणात अमित शाहकडून हर्षवर्धन पाटील यांचा उल्लेख

—————————————–

या कार्यक्रमांमध्ये गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी भाषणामध्ये प्रतिक्रमाफीची रक्कम दंड व व्याजासह रु.30 हजार कोटी पर्यंत गेल्याचे नमूद करताना हर्षवर्धन पाटील यांचा उल्लेख हर्षवर्धन भाई असा केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *