दि. ११ सप्टेंबर

इंदापूर : कसलाही पुरावा नसताना फक्त तांत्रिक माहितीच्या आधारे इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अट्टल चार चाकी वाहन चोरांना अत्यंत शिताफीने अटक केल्याने सर्वत्र इंदापूर पोलिसांचे कौतुक होत आहे.
सविस्तर माहिती अशी की दि. २४ रोजी बावडा तालुका इंदापूर येथे राहणारे फिर्यादी यांनी आपल्या घराच्या शेजारी इंदापूर अकलूज रोड लगत आपली चार चाकी बोलेरो गाडी पार्क केलेली चोरीला गेल्याची फिर्याद इंदापूर पोलीस ठाण्यात दिली.
पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे शोध पथकास ताबडतोब मार्गदर्शक सूचना करून फक्त तांत्रिक माहितीच्या आधारे इंदापूर, अकलूज, बारामती, बीड , धाराशिव येथील शंभर ते दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे चे फुटेज तपासून आरोपी १) अब्दुल रहीम अब्दुल करीम शेख वय 52 वर्ष राहणार दिलावर नगर बीड २) बशीर बनिमिया शेख वय 42 वर्ष राहणार एकता नगर जुना बस डेपो धाराशिव यांना अटक करून इंदापूर पोलीस स्टेशन येथे आणले असता सदर आरोपी हे सराईत चार चाकी वाहन चोर असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याकडून पूर्वी कळंब, नाशिक, पनवेल , विजापूर, कर्नाटक येथे चार चाकी आणि चोरीचे गुन्हे निष्पन्न झाले व त्यांनी चोरी केलेले बावडा येथील बुलेरो गाडी व शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तसेच खेड तालुक्यातील चोरी केलेले दोन पिकअप तसेच चोरी करताना वापरलेली इंडिका कार अशी दहा लाख रुपये किमतीची चार वाहने हस्तगत करण्यात आली.
सदरची कारवाईत अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, आनंद भोईटे अप्पर पोलीस अधिकारी, गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सहाय्यक फौजदार प्रकाश माने, कचरू शिंदे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव, गणेश डेरे , विशाल चौधर, गजानन वानोळे, होमगार्ड संग्राम माने, लखन झगडे यांनी सहभाग घेतला.
