दि. १२ सप्टेंबर

 

इंदापूर : (दि ११) इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने इंदापूर शहराचा नावलौकिक उंचविणारे त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीतुन समाजसेवा करणाऱ्या नागरिकांचा गुणगौरव समारंभ पंचायत समिती येथे शंकरराव पाटील अल्पबचत सभागृहांमध्ये मोठ्या उत्साहात महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्याध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन यांचे शुभहस्ते व सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य भारत आबा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

इंदापूर शहर नागरि संघर्ष समिती नेहमीच शहरातील नागरिकांच्या व शहराच्या भल्यासाठी कार्यरत असते. सध्या इंदापूरकरांच्या प्रश्नासाठी नगरपालिकेच्या समोर ही समिती व पदाधिकारी सलग १७५ दिवसापासून धरणे आंदोलन करीत आहे व सध्या हे आंदोलन चालूच आहे. शहरातील नागरिकांच्या हिताचे जिव्हाळयाचे कोणतेही प्रश्न असो इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती अतिशय पोट तिडकीने प्रशासनासमोर मांडून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करीत असते.

शहराचा नावलौकिक उंचविणारे व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवराचा सन्मान इंदापूर शहर नागरि संघर्ष समितीचे प्रमुख संयोजक प्राध्यापक कृष्णा ताटे व प्राध्यापक महादेव चव्हाण यांनी नुकताच केला.

 

गुणगौरव करण्यात आलेले व्यक्ती व देण्यात आलेला पुरस्कार

१) जयवंत नायकुडे सर : संस्थापक अध्यक्ष जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग स्कूल इंदापूर : बेस्ट कॉलेज ऑफ महाराष्ट्र. .. पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान

व शहरात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मान

२) धरमचंद लोढा : इंदापूर भूषण

३) दत्तात्रय गुजर : इंदापूर वैभव

४) रमेश (आबा)शिंदे : आदर्श समाजसेवक

५) प्रशांत गिड्डे (सर) : पतंजली योग गुरु

६) संतोष (शेठ) भागवत : आदर्श व्यापारी

७) महेंद्र गुंदेचा : आधुनिक श्रावण बाळ

८) हमीदभाई आतार : एकात्मता व धर्मनिरपेक्षता

९) मेजर महादेव सोमवंशी : आदर्श माजी सैनिक

१०) मेजर आमोद कुलकर्णी : ऑपरेशन रक्षक

११) 

१२) प्रा. महादेव चव्हाण (लेखक) : प्राध्यापक अरुण दा ढवळे वांडमय 

१३) कुमुदिनी कडवळे : आदर्श महिला बचत गट

१४) डॉ. राणी ताटे : संस्कृत हिंदी मराठी इंग्रजी भाषा तज्ञ

१५) बाळासाहेब क्षिरसागर : अनाथांचा नाथ

१६) रघुनाथ दादा खरवडे अर्जुन शिंदे( सलग १७५ दिवस धरणे आंदोलन सुरूच आहे) : संघर्षशील

१७) अशोक ननवरे प्रदीप पवार बापू गायकवाड: सामाजिक कार्यकर्ता

१८) ज्ञानदेव जामदार( छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांचा पुतळा बनवून इंद्रेश्वर मंदिरात बसविल्याबद्दल : विशेष पुरस्कार

१९) संतोष जामदार : रुग्णसेवेबद्दल विशेष पुरस्कार

२०) शेलार मामा (वय८८ वर्षे) : लढवय्या

पत्रकार सिद्धार्थ मखरे यांनी नुकतीच एलएलबी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

असे विविध पुरस्कार शहरातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहिले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग स्कूलचे विद्यार्थिनी आकांक्षा दाभाडे यांनी केले तर

कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक कृष्णा ताटे यांनी सर्वांचे आभार मानले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *