दि. २३ सप्टेंबर

जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे व राष्ट्रीय कुस्ती संकुल वडकी यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तर कुस्ती स्पर्धेत कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर कनिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू दयानंद बेरे याने १९ वर्ष वयोगटात ६७ कि. वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून विभागस्तर कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली तसेच जोग महाराज व्यायामशाळा केळगाव आळंदी येथे झालेल्या जिल्हास्तर वुशू स्पर्धेत साहिल बनसुडे ५४ किलो
वजनगटात प्रथम क्रमांक व आदित्य बनसुडे याने ४८ किलो वजनगटात प्रथम क्रमांक मिळवून विभागस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील , निरा भिमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, सचिव ॲड. मनोहर चौधरी, सहसचिव प्रा.बाळासाहेब खटके, प्राचार्य डॉ. जीवन सरवदे ,उपप्राचार्य प्रा. दत्तात्तय गोळे यांनी वरील खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंना मार्गदर्शन क्रीडासंचालक डॉ.भरत भुजबळ व क्रीडा शिक्षक प्रा. बापू घोगरे यांनी केले.
