दि. २३ सप्टेंबर

इंदापूर  :- ( दि.२३)  येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अंकित असणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात संस्थेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने सलग आठ दिवस (सुट्टया वगळून) विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेचे उद्घाटन इंदापूरच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरेंच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

 एकाग्रता,कष्ट, निष्ठा व कौशल्य या गुणांच्या बळावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील हिमालय सर करू शकाल, असा मोलाचा संदेश उद्घाटन प्रसंगी शकुंतला मखरेंनी विद्यार्थ्यांना दिला. 

 

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. सहकार्याची भावना वाढीस लागावी याकरिता हस्ताक्षर, निबंध, रांगोळी, चित्रकला, वाद- विवाद, संवाद, वकृत्व, मेहंदी आदी स्पर्धा व फणी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते.

 

स्पर्धेत मोठ्या उत्साहाने बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवल्याने वेगळीच रंगत पहावयास मिळाली. स्पर्धकांनी मन लावून व आपले कौशल्य पणाला लावून विविध कलागुण सादर केले.सर्वच स्पर्धा चुरशीच्या झाल्या. दर्शकांनी स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

स्पर्धेचे आयोजन मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे यांनी केले.

 

यावेळी संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरेंनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थी व विजेत्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

यावेळी सचिव ॲड.समीर मखरेंनी आगामी काळात भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *