दि. २१ ऑक्टोबर

समाजामध्ये सुख, शांती, समृद्धी वाढीस लागू दे देवीचरणी हर्षवर्धन पाटील यांनी केली प्रार्थना
इंदापबावडा येथिल प्रसिध्द श्री कामाक्षी पद्मावती मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त देवीची महाआरती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील या उभयतांच्या हस्ते शनिवारी (दि २१) सायंकाळी करण्यात आली.
याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी समाजामध्ये सुख, शांती, समृद्धी वाढीस लागू दे, अशी प्रार्थना पद्मावती चरणी केली. तत्पूर्वी मंदिरामध्ये भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम झाला. या महाआरतीस विश्वासकाका पाटील, राजवर्धन पाटील, ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे पौराहित्य राजमणी कुलकर्णी यांनी केले. सध्या पद्मावती मंदिरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज महिलांचे सप्तशती पाठ वाचन व विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत.
