दि. २१ ऑक्टोबर

इंदापूर : इंदापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांचा वाढदिवस श्रावण बाळ आश्रमातील मुलांना मिठाईवाटप करून व साठेनगर येथील शंभर कुटुंबांना मोफत डजबीन देऊन पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण भैय्या माने व माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे व मित्र परिवाराच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.
दादासाहेब सोनवणे हे शहरातील गरीब गरजू व होतकरू कुटुंबांसाठी नेहमीच मदतीचा हात देत असतात. सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचा पुढाकार असतो. महापुरुषांच्या जयंती उत्सवानिमित्त रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम असे वेगवेगळे उपक्रम राबवून आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने अतिशय तळमळीने समाजसेवा करीत असतात.
स्वतःच्या वाढदिवसानिमित्त साठे नगर येथील शंभर कुटुंबांना मोफत डजबीन देऊन आपले व परिसरातील अस्वच्छतेमुळे होणाऱ्या गंभीर आजारापासून चार हात लांब राहता येते हा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
वाढदिवस साजरा करताना मित्र, नातेवाईक यांना मांसाहारी जेवण व सोबतीला दारू ही फॅशनच बघायला मिळते, परंतु दादासाहेब सोनवणे यांनी या गोष्टीला फाटा देऊन श्रावण बाळ आश्रमातील मुलांना मिठाईवाटप करून आपला वाढदिवसाचा दिवस आपल्या मित्र परिवारासह या मुलांबरोबर हितगुज करून घालविला. यावेळी त्यांचा प्रचंड मित्रपरिवार उपस्थित होता. वाढदिवसाच्या औचित्य साधून नवरात्र उत्सवानिमित्त देवी भक्तांना फराळ व खिचडीचे वाटप देखील करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल
ननवरे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) इंदापूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे, प्रा.अशोक मखरे,शिवसेना शहर अध्यक्ष अशोक देवकर ,अहमदरजा सय्यद, प्रा. डॉ.अमोल उनाळे सर,विकास शिंदे,माळी समाज अध्यक्ष , ललेंन्द्र शिंदे, बाळासाहेब अडसूळ,राजू मुळीक,चंदु सोनवणे,बाळासाहेब क्षिरसागर,सुभाष ननवरे, प्रवीण ननवरे,साईराज ढावरे , रणजीत ढावरे, विशाल ढावरे, आप्पा खंडागळे, आकाश कसबे, शंकर भिसे, उपस्थित होते
