दिनांक २ एप्रिल

 

 

पुणे प्रतिनिधी

 

पारधी समाजाचा इतिहास “आदिवासी संस्कृती इतिहास आणि वेदना” या नावाने ज्येष्ठ नेते भास्कर भोसले यांनी पाच वर्षे संशोधन करून भारतामध्ये पहिल्यांदा आदिवासींच्या लिखित स्वरूपात वाचकाच्या समोर आणला. भारतातील लाखो आदिवासी बंधू आदिवासीचा खरा देशभक्त “समशेरसिंग भोसले” यांची पुण्यतिथी १ एप्रिल रोजी देशभर साजरी करतात

भास्कर भोसले म्हणाले की सन १ एप्रिल या दिवशी पारधी समाजाचा सच्चा देशभक्त समशेर सिंग भोसले यांची जयंती देशभर पारधी बेडे, पाडे, तांडे या ठिकाणी साजरी होत असते महाराष्ट्रात फासेपारधी यांची संख्या ३४ लाख इतकी आहे.याही वर्षी पौड (पुणे) येथे मोठ्या धुमधडाक्यात या १८५७ च्या स्वातंत्र्य सेनानी देशभक्ताला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. पुढे बोलताना भास्कर भोसले म्हणाले की या सच्चा देशभक्ताची जयंती प्रत्येक वर्षी सर्वांनी धुमधडाक्यात साजरी करावी व मेरी पहचान मिटने ना देंगे, जय दादाजी जय वाघरी ,जय पारधी असे म्हणून या थोर सच्चा देशभक्ताला विनम्र अभिवादन.

इतिहास संशोधक भास्कर भोसले हे महाराष्ट्र शासनाचे आदिवासी सेवक व साहित्यिक आहेत.

पुढे बोलताना आदिवासी व पारधी समाजाला त्यांनी विनंती व आवाहन करताना म्हणाले की पुढील वर्षी या देशभक्ताची जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात यावी.

यावेळी रोहीत भोसले,सचिन भोसले,संजय भोसले,संतोष भोसले,दिलीप भोसले,कपु-या काळे,दिलीप काळे,आरबिनाथ काळे,ॠशी पवार,हनुमंत पवार,युवराज काळे,कुणाल भोसले,बलवर पवार,सुनिल काळे,नितीन शिंदे,सुनिल भोसले,राजेंद्र भोसले,अनिकेत काळे,अनिल भोसले, इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *