प्रकाश आरडे : स्वराज्य न्यूज

इंदापूर येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी आल्या असता धनगर  ऐक्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शशिकांत तरंगे यांनी महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण केंद्र सरकारने तात्काळ निर्णय घेऊन जाहीर करावे अशा आशयाचे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यात धनगर समाजाची एकूण लोकसंख्या ११% आहे धनगर समाज आर्थिक, सामाजिक, राजकीय या सर्व क्षेत्रात मागास आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १३ सप्टेंबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील बैठकीमध्ये पाच राज्यातील १२ जनसमुदायांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.ही राज्य छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू व कर्नाटक आहेत या राज्यातील १२ जन समुदायाला संविधानामध्ये हिंदी आणि इंग्रजी मुळे जसे काना,मात्रा,उकार,वेलांटी,टिंब किंवा इंग्रजी स्पेलिंग मिस्टेक दुरुस्त करून आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे.तसेच महाराष्ट्रातील र आणि ड धनगर आणि धनगड अशी मिस्टेक दुरुस्त करून धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा व तसे आरक्षण केंद्र सरकारने तात्काळ जाहीर करावे असे म्हटले आहे.

यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राम शिंदे, माऊली वाघमोडे व धनगर  ऐक्य परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *