दिनांक ९ जून

इंदापूर (दि ८) : निरवांगी (ता.इंदापुर ) काशीद वस्ती येथील शेतीच्या वादातून वैभव भीमराव काशीद व त्यांच्या कुटुंबीयांना जमाव गोळा करून भांडणात झालेल्या मारहाणीतील वालचंदनगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यातील (गु.र.न.०२२६) आरोपींवर योग्य कलमान्वये गुन्हा दाखल न केल्याच्या व योग्य कारवाई न केल्याच्या निषेधार्थ फिर्यादी वैभव काळे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांच्या कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे अप्पर पोलीस अधिकारी बारामती यांना दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की दिनांक ३०/०५/२०२४ रोजी नाना काशीद,शोभा काशीद,सागर काशीद, वैष्णवी काशीद, समाधान काशीद, सौरभ उर्फ सोन्या कांबळे,सुमीत कांबळे,राजेश काशीद, (सर्व रा.निरवांगी ता.इंदापुर) यांनी व त्यांच्या ओळखीतील खोरोची येथील तुकाराम खरात, ऋषीकेश देवकर, निरंजन पवार,बाला वाघमोडे, व अनोळखी पाच अंशांनी आमच्यावर हल्ला करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली .या मारहाणीत आम्हाला गंभीर दुखापती झाल्या आहेत सध्या आम्ही दवाखान्यात उपचार घेत आहोत.असे असताना त्यांच्यावर ३२९,३२६,३५४,३२४,३४१,४२७,३२६,५०४,१४३,१४७,१४८,१४९,१३५ कलमान्वये गुन्हे दाखल आहेत तरी देखील ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल केला नाही उलट आरोपी हस्ते परहस्ते आम्हास धमकावत आहेत.

निवेदनात असेही नमुद केले आहे की सदर आरोपी हल्लेखोर यांच्यावर विविध पोलीस स्टेशन मध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.सदर भांडणात नमुद गुन्ह्यातील (गु.र.नं ०२२६) आरोपींनी आम्हास जीवे मारण्याचे उद्देशाने धारदार शास्त्राने आम्हाला जखमी केले व लोखंडी रॉड, काट्या आणि बांधकामाच्या विटाने आमच्यावर हल्ला केला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपीवर भा.द.वी कलम ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करावा व योग्य ती कारवाई करण्यात यावी न केल्यास आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दिनांक १० जून पासून आमरण उपोषणाला बसणार आहोत उपोषण काळात आमच्या जीवास काही बरे वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली व प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी असेही नमूद करण्यात आले आहे.
निवेदनाच्या प्रती विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर, परिक्षेत्र कोल्हापूर, उपविभागी पोलीस अधिकारी बारामती, यांच्यासह पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन जंक्शन व तहसीलदार इंदापूर यांना देण्यात आले आहे.
निवेदनावर वैभव सिताराम काशीद, भीमराव सिताराम काशीद, छत्रपती सिताराम काशीद, रतन छत्रपती काशीद, शकुंतला भीमराव काशीद, ज्योती छत्रपती काशीद, संतोष चांगदेव काशीद यांच्या सह्या आहेत .
