प्रकाश आरडे  : स्वराज्य न्युज

इंदापूरात येत्य गुरुवारी दिनांक २९ सप्टेंबर रोजी शिवशंभो प्रतिष्ठान आयोजित भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन  केले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शुभम पोपट पवार यांनी दिली. प्रतिष्ठानचे हे दुसरे वर्ष आहे, हा महोत्सव इंदापूर येथे नेताजी नगर चाळीस फुटी रोड महादेव मंदिरासमोर या भव्य दिव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन केले आहे. यासाठी या महोत्सवात फक्त स्त्रिया व मुलींनाच प्रवेश आहे. हा महोत्सव बंदिस्त व प्रशस्त जागेवर असणार आहे. महोत्सवामध्ये विविध बक्षिसे ठेवले आहेत, तर लकी ड्रॉ मार्फत मानाची पैठणी भाग्यवान विजेत्यास मिळणार आहे. महोत्सवासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष अंकिता शहा तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर व नायब तहसीलदार अनिल ठोंबरे उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवाचे खास आकर्षण म्हणून डीजे ऑपरेटर इशिका व एस के लाईट वाय अँड ऑडिओ वेळापूर हे आहेत. यासाठी शहरातील महिला व मुलींमध्ये या महोत्सवाविषयी प्रचंड उत्सुकता लागली आहे.

प्रतिष्ठान नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवित असतो. यामध्ये या प्रतिष्ठानचे तरुण पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवतोड मेहनत करतात. शिवशंभो प्रतिष्ठानने आजपर्यंत अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.यामध्ये कोरोना काळामध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तसेच कोरोना काळामध्ये धान्य किट वाटप, व मागेल त्याला  घरपोच मंडईची सुविधा उपलब्ध करून दिली होती तसेच नेत्र शिबिर यामध्ये मोफत डोळ्याचे ऑपरेशन , शहरामध्ये विविध ठिकाणी कोरोना काळामध्ये सॅनिटायझर फवारणी असे समाज उपयोगी उपक्रम राबविल्यामुळे शिवशंभो प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रचंड उत्सुकता लोकांमध्ये असल्याचे पाहावयास मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *