प्रकाश आरडे :  स्वराज्य न्युज

इंदापूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पदी बाळासाहेब सरवदे यांची निवड

इंदापूर येथे शासकीय विश्रामगृहात पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी इंदापूर तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली तर शहराध्यक्षपदी अमोल मिसाळ व युवक  अध्यक्ष पदी संदेश सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली नियुक्ती चे  पत्र सूर्यकांत वाघमारे यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.

शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात पश्र्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व लोनावळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा प्रभारी संघटक सचिव शिवाजीराव मखरे यांच्या अध्यक्षतेखाली दौंड पंचायत समितीचे उपसभापती व इंदापूर तालुका निरिक्षक विकास कदम दौंड तालुका अध्यक्ष रविंद्र कांबळे नरेश डाळींबे सरचिटणीस गणेश गायकवाड व इंदापूर तालुका मार्गदर्शक संदीपान कडवळे यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, शिवाजीराव मखरे, विकास कदम,गणेश गायकवाड, संदीपान कडवळे,अमोल मिसाळ, नितीन झेंडे,यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक राकेश कांबळे केले तर आभार महेश सरवदे यांनी मानले,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण मखरे विकास भोसले प्रताप मिसाळ जयकुमार सोनवणे दिगंबर चव्हाण भारत सावंत अर्जुन चितारे सोमनाथ चितारे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *